घोरपडे पेठेतून हरवलेला “साजिद “अखेर सापडला;खडक पोलिसांची कामगिरी

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

घोरपडे पेठेतून हरवलेला ” साजिद ” अखेर सापडल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. साजिद जावेद सय्यद वय ११ वर्ष रा मोमिनपुरा.हा ८ जुलै २०२३ रोजी दुपारी महर्षी आण्णा शिंदे विद्यालय घोरपडी पेठ येथून कोणास काही एक न सांगता निघून गेला होता.

पोलीस शिपाई घाडगे , पोलिस शिपाई वाबळे, गायकवाड, कुडले असे CCTV फुटेज पाहणी करून तसेच त्या शाळेचा शिक्षक स्टाफ च्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो दरम्यान कोंढवा भागात लेडी हलीमा कॉलेज या ठिकाणी मिळून आला.

त्यास खडक पोलीस ठाणे येथे बोलवून रात्रपाळी अधिकारी पीएसआय पवार यांचे समवेत त्याचे आई वडील यांना बोलवून खात्री करून त्यांचे ताब्यात दिले त्यांनी खडक पोलिसांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here