पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील वानवडी पोलिस ठाण्याचे हद्दीत येणारे बीटी कवडे रोडवर अचानकपणे व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. सराफी व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना काही मिनीटांपुर्वी झाली आहे. याबाबतची खबर पोलिसांनी मिळाली असून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवरून जाणार्या दुचाकीस्वारावर गोळीबार झाला आहे.

त्याच्या पायावर गोळया झाडण्यात आल्या आहेत. ६ गोळया झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्यासह वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.वानवडीतील बीटी कवडे रोडवर गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रतिक मदनलाल ओसवाल वय ३५ यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ओसवाल हे सराफी व्यावसायिक असून हल्लेखोर हे कोटय़वधी सोन्या-चांदीचे दागिने घेवून पसार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.