जावेद शेख याला धान्य विकणारे रेशनिंग दुकानदार शोधण्यास पुरवठा विभाग सपशेल फेल?
रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का दाखल करा असे परिपत्रक असताना दुकानदारांवर मोक्का दाखल का होत नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे सारख्या शहरात दिवसेंदिवस सरकारी रेशनिंगचे धान्य चोरी व ते धान्य गोरगरिबांच्या तोंडातून काढून काळया बाजारात विक्री करणारी टोळी सक्रिय असताना देखील पुरवठा विभाग सपशेल अपयशी ठरले आहेत. तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट ह्याच्यांकडे मंत्री पद असताना बरेच रेशनिंग माफियांवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. परंतु त्या नंतर मोक्का दाखल करण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे?
भवानी पेठेतील भंगार विक्रेता जावेद लालू शेख याच्याविरुद्ध जीवना आवश्यक वस्तू कायदया अंतर्गत आतापर्यंत तीन ते चार गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांना व अन्न धान्य वितरण विभागाला जावेद शेखचा पत्ता साडतं, त्याच्यावर गुन्हे दाखल करून पोलिस व पुरवठा विभाग मोकळे होत असले तरी अद्यापही शेख याला रेशनिंगचे धान्य विकणारे ते महाभाग रेशनिंग दुकानदार कोण हे अजूनही गुलदस्त्यातच आहे?
जेव्हा रेशनिंगचा धान्य धरला किंवा पकडला जातो त्यावेळी झोपेतून उठलेली अन्न धान्य वितरण कार्यालयातील यंत्रणा कारवाईचा आव आणून दोन-तीन दुकाने तपासून किरकोळ कारवाई करून मोकळे होउन दफ्तर बंद करून धुळ खायला सोडले जाते. परंतु धान्य काळया बाजारात विकणारे दुकानदार शोधण्यासाठी सगळीच यंत्रणा सपशेल फेल झाली आहे.
फेल होण्याची कारणे पण तशीच आहे “आळीमीरी गुप चिरीमिरी” आणि “जीओ और जिने दो ” असे प्रकार सध्या चालू असल्याने जावेद लालू शेख याला धान्य विकणारी दुकानदारांची टोळी अजूनही अंधारातच आहे. तर आता पुणे सिटी टाईम्स या दुकानदारांवर वॉच ठेवून ते उजेडात आणणार आहे.