कोंढव्यातील त्या फंक्शन हॉलचे निघाले जप्तीचे वॉरंट,

0
Spread the love

कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना भाड्याने दिले जात आहे हॉल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, लाखोंच्या व कोटींच्या पुढे पुणे महानगर पालिकेचे कर ( टॅक्स) असल्याने पुणे महानगर पालिकेने कारवाईचा मोर्चा कोंढव्याकडे वळविला आहे.

कोट्यावधी व लाखोंची प्रोपर्टी टॅक्स थकीत असतानाही आज राजरोसपणे सदरील हॉल सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी केल्यानंतर खळबळून जागी झालेली यंत्रणा कामाला लागली आहे.

कोंढवा खुर्द येथील ४ फंक्शन हॉलला टाळे ठोकण्याचा इशारा मिळाला असला तरी त्यांच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. १) वेलकम ३२ लाख १७ हजार ७१७ , २) सिटी लॉन्स ३८ लाख ९१ हजार ३२०, ३) बिस्मिल्लाह हॉल ४३ लाख ‌७४ हजार ४५५, ४) Ask हॉल १ कोटी ७ लाख ८५ हजार अशी प्रॉपर्टी थकबाकीदारांची नावे आहेत.

ASK हॉलकडे १ कोटीच्यावर कर थकीत असतानाही त्याच्यावर कारवाई का झालेली नाही. सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारी मनपा आज लाखोंच्या आणि कोटींच्या घरात प्रोपर्टी टॅक्स थकबाकी असतानाही कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कधी या संदर्भात तक्रारच दाखल झाली नसती तर आज कदाचित जप्तीचे वॉरंट निघाले असते का? असा प्रश्न देखील खान यांनी विचारला आहे. पुणे महानगर पालिकेने वेळ न दवडता त्वरित सदरील फंक्शन हॉलला टाळे ठोठावे जेणेकरून थकीत रक्कम मनपाच्या तिजोरीत जमा होईल, आणि जप्ती वॉरंट निघूनही थकीत कर न भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here