खळबळजनक, फरासखाना पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी इमारतीवरून पडून जखमी

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी इमारतीवरून खाली पडल्याची माहिती मिळाली आहे. सदरील वरिष्ठ पोलीस अधिकारी कात्रज जवळील आंबेगाव येथे राहत असून इमारतीवरून पडून गंभीर जखमी झाले आहेत.

अशोक धुमाळ असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून ते ताणतणावात असल्याची खात्रीलायक प्राथमिक माहिती मिळाली असून नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. गंभीर जखमी झालेल्या अशोक धुमाळ यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अशोक धुमाळ हे पुणे पोलिस आयुक्तालयातील फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत. तांत्रिक चुकांमुळे मोक्याच्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटल्याने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून ते अत्यंत तणावाखाली असल्याचे व त्याबाबत ते सातत्याने बोलत असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले जात आहे.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अशोक धुमाळ हे राहत्या घराच्या इमारतीचे तिसऱ्या मजल्यावरून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नसून संबंधित कर्मचारी व नातेवाईकांमध्ये ते अत्यंत तणावाखाली होते अशी चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here