व्याजाचे पैसे परत दिले नाही म्हणून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी कोंढव्यातील “शेरखान पठाण” यांना अटक

0
Spread the love

महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायद्यानुसार कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

व्याजाचे पैसे परत दिले नाही म्हणून एका ४० वर्षाच्या महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कोंढव्यातील शेरखान चांदखान पठाण ७७ रा. शेरखान चाळ, ग्रीन पार्क कोंढवा पुणे.यांच्या सहित ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

हकीकत अशी की फिर्यादी महिलेला पैशाची गरज असलेने शेरखान यांच्याकडून मे २०२१ मध्ये प्रति महिना २० टक्के व्याजदराने २० हजार देवुन आज पावेतो व्याजाचे २० टक्के दराने एकुण ५८ हजार ४०० रुपये व्याज परत घेतले,

असुन मुद्दलाचे मोबदल्यात फिर्यादी कडुन मथुरा पतसंस्था सोलापुर यांचा एक कोरा चेक घेवुन व्याजाचे पैसे मुदतीत न दिल्याने फिर्यादीस शेरखान याने त्याचे ऑफिसवर बोलावुन व्याजाचे पैसे मुदतीमध्ये का देत नाही असे म्हणुन शिवीगाळ करुन धमकी दिली आहे.

संबंधितांविरुद्ध भादविक ५०६, ५०४,३४ सह महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा कलम ३९,४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here