राऊतांची मालमत्ता जप्त झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
पुणे सिटी टाईम्स ( पीसीटी) प्रतिनिधी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता “ईडी”ने जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे.
त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे.
अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक प्लॉट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
संजय राऊतांसोबत संपर्क साधला असता, ते म्हणाले मला कुठलाही फोन केलेला नाही. मला नोटीस दिलेली नाही. मी दिल्लीत असून मला याबाबत काहीही माहिती नाही. असे एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.