वानवडी पोलिसांचे ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध हातभट्टीदारु वर समाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. गावठी हातभट्टी दारूचा साठा व विक्री करणा-यावर कारवाई करून त्यांचेकडुन ४ लाख २४ हजार ५०० रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्वे नं.६८, संतोषनगर, हांडेवाडी रोड, येथे गावठी हातभट्टी दारु तयार करुन विक्री करीत असलेबाबत गोपनिय बातमी मिळाली.सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवुन ठेवलेली एकुण १० हजार लिटर गुळमिश्रित रसायन किमंत अंदाजे ४ लाख १ हजार ५००व दारु किंमत अंदाजे २३ हजार असे एकुण ४ लाख २४हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल मिळुण आला असुन,सदर बाबत एक आरोपी विरूध्द वानवडी पो.स्टे. गुरनं. २६५/ २०२३, महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त,रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच अनिकेत पोटे, राजेश माळगावे, पोलीस अंमलदार, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, सदीप कोळगे, किशोर भुजबळ,इम्रान नदाफ ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.