हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे चालणा-या जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; २० जणांवर कारवाई

0
Spread the love

समाजिक सुरक्षा विभागाला अवैध धंदे सापडतात, मग हडपसर पोलिसांना का नाही?

कोणाच्या हितसंबंधाने चालू आहे अवैध धंदे.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील हडपसर भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असताना हडपसर पोलिसांच्या डोळ्यावर काळा चष्मा लागल्याने तो चष्मा उतरविण्यासाठी समाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे.
मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २० जणांवर कारवाई करून १ लाख १ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हडपसर हद्दीत बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत असलेबाबत प्राप्त झालेल्या बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर कल्याण मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १९ इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात रोख रक्कम व १५ मोबाईल जप्त केले आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेचअश्विनी पाटील,पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, इरफान पठाण, संदिप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here