वाहनांवरील प्रलंबित असलेले वाहतूक नियमांचे भंग केलेल्या चलनाची निर्गती तडजोडअंती सूट देवून करण्यात येणार आहे.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे वाहतूक शाखेने पुढाकार घेत वाहनांवरील दंडाची रक्कम तडजोड करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचे तर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघनासंदर्भात असलेले प्रलंबित चलन केसेसचा निपटारा करणे करीता पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा येथे ९ सप्टेंबर २०२३ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.सदर लोक अदालतीचे अनुषंगाने दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा (येरवडा) या ठिकाणी सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजीनगर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर, यांचे समवेत बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार २८ ऑगस्ट २०२३ रोजीपासून वाहतूक शाखा येथे प्रलंबित वाहतूक चलनांचे तडजोडीनंतर दंडातील सवलतीबाबतच्या माहितीचा हेल्पडेस्क सुरु करण्यात येत आहे.त्याअंतर्गत लोकहितासाठी व प्रलंबित खटल्यांची निर्गती करण्यासाठी नागरिकांचे वाहनांवरील प्रलंबित असलेले वाहतूक नियमांचे भंग केलेल्या चलनाची निर्गती तडजोडअंती सूट देवून करण्यात येणार आहे.
ज्या वाहनचालकांच्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केलेबाबत केसेस प्रलंबित आहेत, अशा वाहनचालक, मालक यांनी २८ ऑगस्ट २०२३ रोजी पासून सकाळी ११ ते २ व ३ ते ५ या वेळेत पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा येथे येवून आपले वाहनावर असलेल्या प्रलंबित केसेसच्या निर्गतीचे अनुषंगाने उपस्थित राहिल्यास वाहन चालकांवरील प्रलंबित दंडाची रक्कम तडजोडीनंतर वाहन चालकांवरील दंड चलान कमी होईल. पोलीस आयुक्त, यांचे संकल्पनेतून व पोलीस सह आयुक्त,यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांना ‘जिल्हा हेल्पडेस्क’ ही सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.असे वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे.