नियमभंग केल्याप्रकरणी पुण्यातील हॉटेल,रेस्टॉरंट बार,पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; लाखोंचा दंड वसूल

0
Spread the love

९ एप्रिल २०२२ ते २८ डिसेंबर २०२२ पर्यंत १५० जणांवर कारवाई.

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) अजहर खान

पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, रेस्टॉरंट ( पब) यांनी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई करून लाखों रूपयांचा महसूल जमा केल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, पब व्यवसायिकांच्या गोठयात खळबळ उडाली आहे. प्रत्येकी ५० हजार दंड वसूल करण्यात आल्याने ऐवढी मोठी पहिलीच कारवाई असावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशी कारवाई करून आम्ही पण कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. हया कारवाईत काही पुढा-यांची देखील हॉटेल, रेस्टॉरंट, पब बार असल्याचे बोलले जात आहे.
हॉटेल स्टोन वॉटर मुंढवा,( ३० हजार) सेव्हन सीज होस्पॅलिटी राजा बहादुर मिल पुणे(४० हजार), ब्रोसकी हॉस्पिलिटी कोरेगाव पार्क( ५० हजार), हॉटेल इब्रन ऑफ गार्डन मुंढवा ( ५० हजार), अनवाईड फेअर अँड स्क्वेअर हॉस्पिलिटी मुंढवा, (९०,००० हजार दोनदा कारवाई) हॉटेल प्लेयर्स रेस्टॉरंट खराडी पुणे ( ३० हजार), हॉटेल रणजीत सनट्रायका भांडारकर रोड पुणे ( ४०हजार) हॉटेल मालिनी सोलापूर रोड हडपसर ( ५० हजार) , हॉटेल ग्रीन कोर्ट फातिमानगर वानवडी पुणे ( ४० हजार) हॉटेल अंगूर भेकराईनगर फुरसुंगी पुणे( ५० हजार) हॉटेल ट्विन स्टार कल्याण नगर पुणे ( ५० हजार), हॉटेल करंट नाईन हिल्स महमंदवाडी पुणे( १ लाख व कायमस्वरूपी रद्द), हॉटेल तिरंगा हांडेवाडी हडपसर पुणे( १ लाख व परवाना निलंबित),

हॉटेल फॉर्च्यून ग्रुप वाकड ( ५० हजार), हॉटेल बॅक स्टेज विमान नगर, हॉटेल द व्हिलेज ब्रह्मा मॅजेस्टिक कोंढवा , हॉटेल ट्वीन स्टार कल्याणी नगर पुणे( ५० हजार), हॉटेल कॅफे कोका खराडी पुणे ( ५० हजार), हॉटेल ग्रॅडयुअर कल्याणीनगर पुणे ( ५० हजार), नाईट रायडर्स रेस्टॉरंट धायकर वस्ती मुंढवा ( ५० हजार), हॉटेल एजंट जॅक्स सेनापती बापट मार्ग पुणे ( ५० हजार) पोरन हॉस्पिटॅलिटी भांडारकर रोड पुणे ( ५० हजार),

हॉटेल शेरेटन बंड गार्डन पुणे( ५० हजार), तुवहीश हॉस्पिटॅलिटी शिवाजीनगर पुणे ( ५० हजार), द हॅपी हिप क्लोवर हिल प्लाझा मॉल महमंदवाडी पुणे ( ५० हजार), एस आर एन हॅपी क्लोवर हिल प्लाझा मॉल महमंदवाडी पुणे ,

अरोरा हॉस्पिटॅलिटी रेस्टॉरंट लुंकड स्काय, विमाननगर पुणे ( ५० हजार) हॉटेल युवर हायनेस फाईन अँड डाईन महमंदवाडी पुणे ( ५० हजार), एल.आय टी. हॉस्पिटॅलिटी हॉटेल हायलॅंड सुस रोड बाणेर ( ५० हजार), अतिथय डायनिंग बाणेर ( ५० हजार), ट्रम्प वेंचर्स एजंट जॅक्स बाणेर( ५० हजार) एम अँड एम खराडी ( ५० हजार), मे.नारंग वेंचर इंडिया कल्याणी नगर कॅपिटल पुणे ( ५० हजार), हॉटेल एलेक्स पॉईंट खराडी पुणे, ( ५० हजार), हॉटेल जयुई प्रिझम हॉस्पिटॅलिटी कोथरूड ( ५० हजार), हॉटेल फिस्ट कोरेगाव पार्क पुणे ( ५० हजार), द डॉट्स खराडी ( ५० हजार) द कल हाऊस लक्ष्मी लॉन्स मागे मगरपट्टा हडपसर ( ५० हजार), हॉटेल मेट्रो लॉन्च अँड बार मुंढवा पुणे( ५० हजार), हॉटेल सेव्हन सीज राजा बहादूर मिल पुणे ( ५० हजार),

हॉटेल बॅक स्टेज विमान नगर पुणे, लैमन ग्रास विमाननगर ( ५० हजार), हॉटेल काइस रेस्टॉरंट उंड्री( ५० हजार) हॉटेल टू बीएचके राजा बहादुर मिल पुणे( ५० हजार), हॉटेल पिसमिल राजाबहादुर मिल बंडगार्डन पुणे ( ५० हजार),हॉटेल ) ट्वीन स्टार कल्याणी नगर पुणे ( ५० हजार), हॉटेल लिजर रेस्ट्रोबार कोरेगाव पार्क पुणे ( ५० हजार), ऍक्ट्रावेगंझा राजा बहादुर मिल पुणे ( ५० हजार),

हॉटेल वेस्ट विंड फुड कोर्ट बावधन ( ५० हजार), हॉटेल २४ क्राफ्ट बालेवाडी पुणे ( ५० हजार), हॉटेल अतिथय डायनिंग बाणेर ( ५० हजार), हॉटेल जोकर बाणेर ( ५० हजार), हॉटेल इलिझर बाणेर (३० हजार), हॉटेल फ्लाय हाय खराडी( ५० हजार), स्टोन वॉटर ग्रील मुंढवा पुणे ( ५० हजार), हॉटेल महाराजा न्यू मोदीखाना कॅम्प पुणे( ५० हजार), ट्रेस कॉमाझ राजा बहादूर मिल बंडगार्डन ( ५० हजार), हॉटेल कलेक्टिविटी एम जी रोड कॅम्प( ५० हजार),

हॉटेल ग्रीनफिल्ड सिंहगड रोड ( ५० हजार), हॉटेल ट्रम्प वेंचर्स एजंट जॅक्स बाणेर पुणे( ५० हजार + ५० हजार दोन वेळा कारवाई), हॉटेल मेट्रो लॉन्ज अँड बार कोरेगाव पार्क ( ५० हजार), २४ क्राफ्ट बिव्हज बालेवाडी पुणे, (५०हजार), हॉटेल ग्रीन पॅवेलियन भोसले नगर हडपसर पुणे, हॉटेल प्लॅटिनम रेस्टॉरंट बावधन पुणे ( १ लाख), हॉटेल सिग्नेचर फाईन डाइन रेस्टॉरंट विमान नगर पुणे, हॉटेल इन्फिनिटी मुंढवा पुणे, हॉटेल ब्लू फॉग कोरेगाव पार्क पुणे, व इतर अश्या एकूण १५० हॉटेलांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई करण्यात आल्याची माहिती पुणे सिटी टाईम्सच्या हाती आली आहे.

नेमकी काय कारवाई करण्यात आली?


रजिस्टर, नोंद वहया अद्यावत नसणे, ज्या ठिकाणी परवानगी नाही अश्या ठिकाणी ग्राहकांना मद्य विक्री करणे, विना परवानगी बदल करणे, रात्री उशिरापर्यंत चालविणे, नोकरनामे, वाहतूक पासच्या नोंदी न घेणे, विक्री साठा नोंद न करणे, निरीक्षणाच्या वेळी हिशोब सादर न करणे, विना वाहतूक परवाना मद्य साठा मिळून येणे, अशी कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here