गोळीबार मैदान येथे वाहतूक कोंडीत पुणेकर अडकले असताना तावरे महाशय पावती फाडण्यास मग्न?
पावत्या फाडताना पुणे सिटी टाईम्सचे प्रतिनिधी व्हिडिओ फोटो काढत असताना तावरे, खांदवे यांनी पाठलाग करून व्हिडिओ डिलीट मारण्यासाठी भाग पाडले.
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरात आज वाहतूकीचा कोंडमारा झाला असताना पुणेकर आज बेहाल झाल्याचे जागोजागी दिसत आहेत. कधी कधी तर नागरिकांना स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवावी लागते. वाहतूक कोंडी सोडविण्याचा काम वाहतूक पोलिसांचाच असताना वाहतूक पोलिस त्यांचा काम प्रामाणिकपणे करायचे सोडून भलत्याच कामात सिंगम गिरी करताना दिसत आहे.हडपसर रामटेकडी ते भैरोबा नाला ते जुना पुलगेट ते गोळीबार मैदान सारखच जाम होताना दिसतं. गोळीबार मैदान येथे तासंतास वाहतूक जाम होत असताना वाहतूक पोलिस मात्र पावत्या फाडताना दिसून आले आहे.
गोळीबार मैदानापासून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ( म्हणजे सॅलिसबरी पार्क दिशेने जाणाऱ्या सिग्नल वर) दुपारी ३ वाजल्यापासून पासून पावत्या फाडत होते.अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस फौजदार (बक्कल नंबर ४२१४) संजय तावरे हया महाशयांची ड्युटी दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी घोरपडी गाव रेल्वे गेट येथे, तर महिला पोलिस शिपाई ( बक्कल नंबर ११०७७ ) राणी खांदवे यांची ड्युटी मंमादेवी चौक येथे सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत होती. तर यांच्या सोबत आणखीन एक वाहतूक पोलिस कार्यरत होते.
👉👉 Video एकीकडे वाहतूक कोंडी झाली असताना वानवडी वाहतूक पोलिस पावत्या फाडण्यास मग्न.ड्युटी एका ठिकाणी तर वसुली दुसऱ्या ठिकाणी?

पीकअवर मध्ये वाहतूक सुरळीत करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्तांचे आदेश असताना मात्र तावरे, खांदवे यांनी आदेश पायदळी तुडवले आहे. आमचं कोणी काही करू शकत नाही? असे या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. डेक्कन परिसरात एका पेक्षा किंवा दोन पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी थांबल्यामुळे वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी निलंबनाची कारवाई करून दाखवली होती.तर काही दिवसांपूर्वी कोथरूड येथील नळस्टॉप येथे वाहतूक पोलिसाने केलेल्या चुकिच्या वसुली बाबतीत निलंबनाची कारवाई केली होती.

तर अशीच कारवाई संजय तावरे व महिला शिपाई खांदवे यांनी स्वतःची ड्युटी चोख न बजवता, नेमून दिलेल्या जागेवर कर्तव्य न बजवता भलत्याच ठिकाणी नियमबाह्य वसुली, पावत्या फाडणाऱ्यावर भर दिल्याने पोलिस उपायुक्त निलंबनाची कारवाई करणार का? असा प्रश्न पुणेकरांनी विचारला आहे.
प्रकरण अलंगट येण्यापूर्वीच पावत्या करून मोकळे?
सहायक पोलीस फौजदार संजय तावरे व महिला पोलिस शिपाई राणी खांदवे यांनी दुपारी ३ वाजता MH 12 UM 4647 डंपर धरला होता. बराच उशीर सेटलमेंट करण्यासाठी धावपळ सुरू होती.पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधी वॉच ठेवले असल्याचे समजल्याने डंपर सोडून दिले व सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी पावती ऑनलाईन टाकण्यात आली. म्हणजे प्रकरण अलंगट येऊ नये यासाठी तब्बल ३ तासांनी पावती टाकण्यात आली आहे.
लाईनवर चालणाऱ्या रिक्षांना सोडून देण्यात येते?
तावरे ,खांदवे यांनी तीन सिटर रिक्षा धरली होती. बराच वेळ त्या रिक्षाचालकाला टाळकत उभे राहवे लागले व काही तासांनी त्या रिक्षाचालकाच्या मालकाचा फोन आल्याने लगेचच रिक्षा सोडण्यात आली. त्या रिक्षा चालकाला प्रतिनिधींनी विचारणा केली असता तो म्हणाला रिक्षा लाईन वरची आहे ( म्हणजे दरमहा हप्ता बांधलेला असतो.) म्हणजे हप्ता देणाऱ्या वाहनांना सोडायचे आणि न देणाऱ्यांना दंड मारायचे अशी अवस्था आज वाहतूक विभागात पाहायला मिळते.