पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्रांमध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांनी ललित कला केंद्राची तोडफोड केल्यानंतर त्या ठिकाणचा बंदोबस्त व्यवस्थित न लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
चतु: श्रुंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन शंकर गाडेकर असे निलंबित उपनिरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईचे आदेश पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले. नवनिर्वाचित पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनी पहिल्याच दिवशी माध्यमांशी बोलताना शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. यानंतर विद्यापीठातील हा गोंधळ झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ललित कला केंद्र या ठिकाणी सचिन गाडेकर यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. यावेळी गाडेकर यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने तसेच त्या ठिकाणी शीघ्रकृती दलाला वेळेत बोलवले नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये नाटकाचा प्रयोग झाला आणि त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी गोंधळ घालत हे नाटक बंद करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्रात घुसत घोषणाबाजी करत त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गोष्टींची तोडफोड केली तसेच खिडक्यांच्या काचा फोडत शाई फेक करण्यात आली होती. सदरील कारवाई करण्यात आल्याने पोलिसांनी धसका घेतला आहे.