रस्त्यावर पाणी येत असल्याने करण्यात आली कारवाई
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुणे शहरातील मध्यवर्ती असलेले शंकरशेठ रोडवर सुयोग डेव्हलपरचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना मोठ्या प्रमाणावर खड्डा ( गौण खनिज उत्खनन) करण्यात आले आहे.
त्या संदर्भात तहसिलदार पुणे शहर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना त्या खड्ड्यात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. सुयोग डेव्हलपरकडून ते पाणी काही दिवसांपासून पुणे महानगर पालिकेच्या ड्रेनेज लाईन मध्ये सोडले जात होते.
पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ड्रेनेज लाईन मधून पाणी रस्त्यावर येत असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. एका सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी सदरील बाब पुणे महानगर पालिकेच्या बिबवेवाडी
क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. त्या नंतर सुयोग डेव्हलपरला पाणी रस्त्यावर सोडल्या प्रकरणी ५ हजारांचा दंड ठोठावला आहे.