स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास पोलिसांनी केले जेरबंद.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास पोलिसांनी जेरबंद केले आहे.या संदर्भात एकाने फिर्याद दिली आहे. २१ जानेवारी २०२४ रोजी फिर्यादी वय ५६ वर्षे, रा. मुंबई हे रोजी स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन स्वारगेट पोलीस ठाणे येथे गु.र.नं.३०/२०२४ भा.द.वि. कलम. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना वरिष्ठानी आदेशीत केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार,संदीप घुले, शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एक संशयीत महिला स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड परीसरात दिसुन आल्याने लागलीच महिला पोलीस अंमलदार खामगळ यांना बोलावुन घेवुन तीचे दिशेने जात असतांना ती पळुन जावु लागल्याने वर नमुद पोलीस स्टाफच्या मदतीने तिचा पाठलाग करुन तिला घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेवुन तिला तीचे नाव व पत्ता विचारता तिने तिचे नाव कार्तीक शर्मा चव्हाण वय ३० वर्षे रा. गाडेवस्ती खानापुरता. शेवगाव जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले

तीचे कडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता तिने दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने तीला अटक करुन तपासादरम्यान तिचे कडुन २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आली आहे.तसेच गेले १५ दिवसामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ४ गुन्हे व मोबाईल चोरीचा १ गुन्हे उघडकीस आला असुन सदर गुन्हयांमध्ये ३ महिला आरोपी व ३ पुरुष आरोपी यांना अटक करुन त्यांचे कडुन तपासादरम्यान एकुण ३,लाख ६० हजार रुपये किंमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व २लाख ५ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १६ स्मार्ट फोन असे मिळुन एकुण ५ लाख ६५ हजार किंमतीचा मौल्यवान व किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२,स्मर्तना पाटील,सहा.पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर. नंदिनी वग्यानी, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, यांच्या आदेशान्वयेतपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे,पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, तपास पथकातील अंमलदार, सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, संदीप मुंढे, तात्या देवकाते, दिपक खेंदाड, संजय मस्के, सुनिता खामगळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here