कोंढवा पोलीस ठाण्याकडू तपास सुरू.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, मालकाकडे काम करत असताना थेट मालकाचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे मालक आजारी असल्याचा गैरफायदा घेऊन बांधकामासाठी पैशांची गरज असल्याने भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले. कागदपत्रावर सह्या घेऊन त्यांची मोटार व मोटारसायकल विकून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरीफ ऊर्फ हनिफ सय्यद, हनिफ दस्तगीर सय्यद वय ३९, रा. एन आय बी एम रोड, कोंढवा व त्यांची पत्नी, बहिण, भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शाहिन रफिक छागला वय ४०, रा. कुल होम्स, कोंढवा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरीफ सय्यद हा फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. फिर्यादी यांचे पती आजारी आहेत. आरीफ याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वडगाव शेरी येथील बांधकाम साईटवरील वेगवेगळ्या कामासाठी पैशांची आवश्यकता आहे,
असे भासवले.त्याने पत्नी, भाऊ, बहिणीशी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडून २५ लाख रुपये बँकेतून काढून घेतले. फिर्यादी यांची चारचाकी गाडी फिर्यादीच्या परवानगीविना आर. टी.ओ कडील टी. टी. फॉर्मवर खोटी सही करुन ७ लाख ५० हजार रुपयांना विकली.
तसेच त्यांची मोटारसायकल घेऊन अशी एकूण ५१ लाख रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.