तहसीलदार राधिका बारटक्के यांनी महिला तलाठयाला तात्काळ मागितला खुलासा; पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहर गुलटेकडी येथील सिटी सर्वे नंबर ५१३/अ/१, ५१३/ब/१,५१३/१, ३६/१३७/१, व ३८ ३९४,३९५ अ,मध्ये सुयोग डेव्हलपर्सचे बांधकाम सुरू असून त्या बांधकामावेळी सुयोग डेव्हलपर्सने गौण खनिज उत्खननाची परवानगी घेतली होती. परंतु लॉक डाऊन लागल्याने सगळीकडे सगळच बंद असल्याने सुयोग डेव्हलपर्सने गौण खनिज उत्खनन केले नाही. लॉक डाऊन संपल्यावर गौण खनिज उत्खनन सुरू केल्याने तो पर्यंत गौण खनिज उत्खननाची मुदत संपली होती.

हे प्रकरण अजहर खान यांनी उघडकीस आणले होते. व अवैधरित्या गौण खनिज उत्खननाचे व्हिडिओ तत्कालीन तलाठी सिमा बबन गेंजगे यांच्या मोबाईल नंबरवर वाटसअपला टाकण्यात आले होते. परंतु गेंजगे यांनी सदरील प्रकरणात हलगर्जीपणा करून शासनाचे नुकसान होईल असे कृत्य केले होते? तर तहसीलदार यांनी १० जानेवारी २०२३ रोजी पत्राद्वारे सविस्तर माहिती मागितली होती. परंतु सिमा बबन गेंजगे यांनी तहसीलदार राधिका बारटक्के यांच्याच पत्राला केराची टोपली दाखवल्याची बातमी “पुणे सिटी टाईम्स” ने प्रसिद्ध केली होती.

मागील बातमी वाचण्यासाठी क्लिक }}} pune | पुणे शहर महिला तलाठीकडून महिनो-महिने अवैध गौण खनिजचा अहवाल तहसीलदारांना पाठविण्यास असर्मथा; तहसीलदार राधिका बारटक्के कारवाई करणार का?

त्या बातमीची दखल घेऊन पुणे शहर तहसीलदार यांनी तत्कालीन तलाठी व विद्यमान मंडळ अधिकारी ( येरवडा) सिमा बबन गेंजगे यांना नोटीस काढली असून गेंजगे यांनी शासनाची फसवणूक होईल असे कृत्य केल्याने का कारवाई करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. क्रमक्ष

” नोटीस काढली परंतु निष्पक्षपातीपणे चौकशी होणार का? “

महिला तलाठी सिमा बबन गेंजगे यांना नोटीस बजावली व खुलासा मागितला असला तरी आम्ही केलेल्या तक्रारीची पडताळणी करून खोटा व दिशाभूल करणारा ईटीएस मोजणी अहवाल सादर केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी.अजहर अहमद खान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here