पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरात दोन लहान बालकांकडून भिक मागवून उदरनिर्वाह करणा-या एका इसमाकडून सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करुन दोन बालकांची सुटका केली आहे.
ब्लु नाईल चौकात वाहतुकीच्या सिग्नल जवळ बंडगार्डन येथील रस्त्यावर राहुल पन्नालाल ठाकुर वय २० वर्षे रा. उरळी कांचन पुणे हा दोन अल्पवयीन मुलींना हाताला धरून मुलींन कडून रस्त्याने येणारे जाणारे लोकांकडून भिक मागवुन घेत असताना मिळुन आला.
त्याला ताब्यात घेऊन त्याचे विरूध्द बंडगार्डन पोलीस ठाण्यात ज्युवेनाईल जस्टीस अॅक्ट कलम ७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही लहान मुलींना भिक मागण्यापासुन सुटका करून बाल कल्याण समीती समोर हजर करून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके,पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, विनोद चव्हाण, मनिषा पुकाळे, आण्णा माने, साईनाथ पाटील,अमित जमदाडे यांनी केली आहे.