जबरदस्तीने मोबाईल घडी चोरून नेणा-या चोरांना विमानतळ पोलिसांनी केली अटक

0
Spread the love

विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत नगर रोडवरील हॉटेल मराठा दरबार चे समोर पुणे येथे फिर्यादी प्रदिप शहाजी जगताप वय २६ वर्षे धंदा फोटो ग्राफर रा. वाघोली पुणे हे जेवण करण्यासाठी आले असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचे खिशातील मोबाईल फोन व हातातील मनगटी घडयाळ जबरीने काढुन घेवुन जबरीने चोरुन नेलेबाबत अनोळखी इसमांविरुध्द दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर आरोपींतांचा विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक पोलीस ठाणे हददीत शोध घेत असताना पोलीस अंमलदार योगेश थोपटे व गिरीष नाणेकर यांना सदरचे आरोपी हे आय टी पार्कचे बाजुला असलेले मोकळे मैदानात पुणे नगर रोड सिगारेट पित बसलेले असले बाबत बातमी मिळाली होती.

तपास पथकाचे प्रभारी अधिकारी रविंद्र ढावरे पोलीस उप निरीक्षक यांना सदरची माहिती दिली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांना कळविली, शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस उप निरीक्षक ढावरे यांनी तपास पथकातील स्टाफसह यातील आरोपी यांना सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांची नावे १) अमित प्रकाश इंगोले वय १९ वर्षे रा. लेन नं ४ पठारे मळा खराडी बायपास जवळ खराडी पुणे २) सागर सुनिल सांगडे वय २१ वर्षे रा. लेन नं २ पठारे मळा खराडी बायपास जवळ खराडी पुणे असे असल्याचे सांगितले अशी आहेत,

त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचे ताब्यातुन जबरीने चोरलेला फिर्यादी यांचा मोबाईल फोन व मनगटी घड्याळ हस्तगत करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ पुणे शहर,किशोर जाधव सहा.पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर,

यांचे आदेशान्वये विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्रीमती संगीता माळी पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे नाना कर्चे, योगेश थोपटे, दादा बर्डे यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here