पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील कोंढवा मधील केबल व्यवसायिकाच्या भावाचा सपासप वार करून खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धारदार हत्याराने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२३ रोजी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवनेरीनगर येथील पारशी ग्राउंडवर उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहानवाज उर्फ बबलू सय्यद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहानवाज याचा भाऊ समीर मुनीर सय्यद रा. ताहिर हाईट्स, फ्लॅट नं २०३, भागोदयानगर, याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी सकाळी कामावर जात असताना शितल पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मित्र आसिफ शेख याने सांगितले की,त्यांचा भाऊ शहानवाज उर्फ बबलू याचा पारसी ग्राउंड येथे खून झाला आहे.
फिर्यादी यांनी तेथे जाऊन खात्री केली. आरोपीने फिर्याद यांच्या भावाच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार हत्याराने सपासप वार करुन निघृण खून केला. घटनेची माहिती मिळताच वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे,पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.कोंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसल करित आहेत.