नागरिकांना चालण्यासाठी उपयोग न होणारेच फुटपाथ दुरूस्तीचा घाट.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासक राज सुरू झाल्याने कोणी वालीच राहिला नाही. उटसुट कुठेही कर खर्च” अशी परिस्थिती आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दिसू लागली आहे. गेल्याच वर्षी बनविलेले फुटपाथ आता पुन्हा दुरूस्तीच्या नावाखाली नागरिकांच्या कराची फक्त उधळपट्टी लावली आहे.
एखाद्या रस्त्याची, फुटपाथाची दुरूस्ती कराची असेल तर त्यासाठी नागरिकांच्या तक्रारी व सहभाग आवश्यक आहे. आणि त्यानंतर जुनियर इंजिनिअर व उप अभियंता हे जाणून पाहणी करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अहवाल पाठवतात आणि त्यानंतर स्वतः क्षेत्रीय अधिकारी पाहणी करून मंजुरी देतात. परंतु भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात फक्त अनागोंदी कारभार सुरू आहे.
लडकत मळा ते विनय शाळे पर्यंत फुटपाथ दुरूस्ती सुरू आहे. परंतु त्या फुटपाथचा वापर नागरिकांना होत नसून वाशिंग मशीन, फ्रिज ठेवण्यासाठी व कचरा फेकण्यासाठी होत आहे.
परंतु बजेट खर्च करायचाच तर होऊ जाऊ द्या ना खर्च? नागरिकांच्या कराची उधळपट्टी करणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी व उप अभियंता, जुनियर इंजिनिअर यांच्यावर कारवाई मागणी नागरिकांनी केली आहे.