विमाननगर मधील “द माफिया” रेस्टॉरंट बारला टेरेसवर दारू विक्रीची परवानगी नसतानाही दारू विक्री; उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष?

0
Spread the love

परवानगी एकीकडे चालते दुसरीकडे?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरात रूफटॉप (टेरेसवर) हॉटेल, रेस्टॉरंट,बारला परवानगी नसतानाही नागरिकांचे जीव धोक्यात घालून राजरोसपणे रेस्टॉरंट परमिट रूम,बार चालविले जात असल्याचे दिसून आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवानगी शिवाय दुसऱ्या ठिकाणी दारू विक्री चालू असल्याचे समोर आले आहे. विमाननगर मधील सर्वे नंबर २३० म्हाडा कॉलनी लुंकड स्काय विसटा या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर ” द माफिया ” रेस्टॉरंट परमिट रूम बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आहे.

परंतु टेरेसवर दारू विक्रीची परवानगी नसतानाही रूफटॉप टेरेसवर बेकायदेशीरपणे दारू विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. आणि विषेश म्हणजे रूफटॉप टेरेसवर दारू विक्रीची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली नसल्याचे देखील लेखी कळविले आहे. मग टेरेसवर बेकायदेशीरपणे दारूची विक्री कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे.

तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याकडे डोळेझाक का होत आहे? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. अधिक माहिती घेतली असता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे हॉटेल असल्याचे बोलले जात आहे.तर एका भाई ने इन्व्हेस्टमेंट केल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय पक्षाशी लागेबांधे जवळीक असल्याने बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करण्यास घाबरत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने तपासणी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. व नागरिकांचे जीव धोक्यात घालून रूफटॉप टेरेसवर हॉटेल थाटणा-या द माफिया हॉटेलवर पुणे महानगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.उत्पादन शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here