फिनिक्स मॉलमधील मॅनेजरनेच घातला २८ लाख रूपयांचा गंडा; विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मॉलमध्ये स्वत मॅनेजरनेच गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.विक्री केलेल्या वस्तूंची रक्कम कंपनीकडे जमा न करता मॅनेजरने तब्बल २८ लाख १४ हजार रुपयांचा कंपनीला गंडा घातला. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी मॅनेजरला अटक केली आहे.फ्रान्सिस जोसफ डेव्हिड वय ३५, रा.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ,दापोडी असे या मॅनेजरचे नाव आहे.याप्रकरणी प्रथमेश पैठणकर वय ३३, रा. एरोली, नवी मुंबई यांनी विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गु. रजि. नं. २९/ २३ दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फिनिक्स मॉलमध्ये ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे फॉसिल इंडिया प्रा.लि. या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर आहेत. फॉसिल कंपनीचे स्टोअर मॅनेजर फ्रान्सिस डेव्हीड याने स्टोअरमधील कामगार तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना विश्वासात घेऊन खोटी माहिती दिली.८ लाख ७३ हजार ४९ रुपये किंमतीच्या कंपनीचे शोरुममधील वॉचेस, ज्वेलरी, बेल्ट, पाऊच,स्ट्रॅप अशा एकूण १४७ वस्तू स्वत:च्या फायद्याकरीता वापरल्या.

तसेच ग्राहकांना विक्री केलेल्या वॉचेसची कॅश काऊंटरवर जमा झालेली १९ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम स्वत: घेतली. ती रक्कम कंपनीत जमा न करता स्वत: वापरुन कंपनीची २८ लाख १४ हजार ४६० रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी मॅनेजरला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here