परिमंडळ अधिकारी झाले “आऊट ऑफ कव्हरेज”.
सर्व रेशनिंग कार्यालयात उलटसुलट चर्चेला आले उधाण.
पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, पुण्यातील रेशनिंग कार्यालयातील एका नायब तहसीलदार तथा परिमंडळ अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने पुणे शहरातील सर्व रेशनिंग कार्यालयात खळबळ उडाली आहे.
निगडी येथील अ”ज” परिमंडळ अधिकारी दिनेश नामदेव तावरे यांनी अचानकपणे राजीनाम्याचे पत्र पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दिनेश तावरे यांची कामकाजाची व कार्यालयातील पारदर्शकतेची चर्चा बरीच दिवस चालली होती. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पुण्यातील नामवंत सामाजिक संस्था, संघटनांनी त्यांचे कौतुक करून प्रशस्तीपत्रक देखील दिले होते. तसेच सर्वात उशिरापर्यंत काम करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तावरे हे तत्पर होते.
परंतु त्यांच्या राजीनामासत्रामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या बाबतीत काहींचे असे म्हणणे की तावरेंवर राजकीय दबाव जास्त होता तर दुसर्या ठिकाणी अ” परिमंडळ विभागाचा कार्यभार आपल्याला मिळावा यासाठी काही परिमंडळ अधिकारी हातपाय मारत होते.
सुत्रांकडून सांगण्यात आले की तावरे यांना काही दिवसांपासून अस्तव्यस्त वाटत होते आणि ते कार्यालयात सुध्दा जास्त कोणाशी बोललत नव्हते, तर त्यांचा कोलेस्टेरॉल देखील मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
परंतु अचानक वरिष्ठांच्या नावाने राजीनामापत्र तयार करून ते देण्यात आल्याने रेशनिंग कार्यालयात देखील सर्व आश्चर्यचकित झाले आहे. दिनेश तावरे हे काल पासून “आऊट ऑफ कव्हरेज” झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.