शोरूमकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुण्यातील हडपसर मधील आर.आर. किराड हुंडाई शोरुम सर्व्हिस सेंटर मधून सर्व्हिसिंगसाठी दिलेल्या कारमधून चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हकीकत अशी की, ११ मे २०२४ रोजी हडपसर मधील MH12wk 5441 ही creta कार पहिली सर्विसिंग साठी शोरुम कडील कर्मचारी घेऊन गेला होता.
कार घेऊन जाताना कारच्या डॅशबोर्डवर एक वस्तू ठेवण्यात आली होती. परंतु कार सोडताना त्या कारमधील वस्तू चोरी झाल्याची कार मालकाच्या निदर्शनास आली. त्या नंतर कार मालकाने शोरूम मधील प्रत्येक लोकांना संपर्क करून कार मधील वस्तू चोरी गेल्याची माहिती कळवली. त्या नंतर काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने, शोरुम सर्व्हिस सेंटर मधील महिला मॅनेजरशी संपर्क करून माहिती कळवली.
pune | हडपसर मधील आर.आर.किराड हुंडाई शोरुम सर्व्हिस सेंटर मधून सर्व्हिसिंगसाठी दिलेल्या कारमधून चोरी.व्हिडिओ.. शोरूमकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ*
चार पाच दिवसांनी महिला मॅनेजरने पहिल्यांदा त्यांच्याच कर्मचाऱ्याचा फोटो टाकला. आणि नंतर तो आपलाच कर्मचारी असल्याचे दोन दिवसानंतर कळविण्यात आले.तो फोटो चुकून आल्याचे सांगितले.कार मालकाने पोलिसात तक्रार देण्याची तयारी दर्शविली असल्याने महिला मॅनेजरने दोन दिवसानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून कार मालकाला ते फुटेज व्हाटसअपद्वारे देण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज देण्यात तर आले त्यात टवाळखोर मुले गाडीत बसून चोरी करत असताना दिसत असल्याने कार मालकाने पोलिसात तक्रार दाखल करण्याची मॅनेजरकडे मागणी केली असता महिला मॅनेजरने तक्रार करण्यास नकार दिला.
एखाद्यी कार सर्विस सेंटरला सोडली तर त्या कारची व त्यातील वस्तू सांभाळण्याची जबाबदारी ही सर्विस सेंटर मधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची असताना ती जबाबदारी नीट पार पाडली जात नाही. सर्विस सेंटर मध्ये कार सोडल्यानंतर कोणीही उठ सूट गाडीत बसून त्या गाडीतील वस्तू चोरी करत असतानाही आर.आर.किराड शोरूम सर्विस सेंटरला काही देणेघेणे नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
अशा बेजबाबदार शोरुमकडून कारवाईची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. नागरिकांनी आपली कार आर.आर किराड शोरूम सर्विस सेंटरला सोडताना दक्षता बाळगावी असे आव्हान गाडी मालकाने केले आहे. तर आर.आर.किराड शोरुम सर्व्हिस सेंटर विरोधात येत्या दोन दिवसांत पोलिसात तक्रार करणार असल्याचे व हुंडाई कंपनीकडे पुरावे देणार असल्याचे creta कार मालकाने सांगितले आहे.