पुणे सिटी टाईम्स 24 : प्रतिनिधी.
महिलांसाठी खजूर खाणं विशिष्ट वेळी खूप फायदेशीर आहे. FDAनुसार, खजुरांमध्ये हेल्दी फॅट्स, सोडियम, आहारातील फायबर, नैसर्गिक साखर, प्रथिने, व्हिटॅमिन डी, लोह आणि पोटॅशियम असते.खजूर (dates ) हे एक सुपरफूड आहे, जे खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. महिलांसाठी खजूर खाणं विशिष्ट वेळी खूप फायदेशीर आहे. FDA नुसार, खजुरांमध्ये हेल्दी फॅट्स, सोडियम, आहारातील फायबर, नैसर्गिक साखर, प्रथिने, व्हिटॅमिन डी, लोह आणि पोटॅशियम असते. तर महिलांसाठी कोणत्या काळात खजूर खाणं खूप फायदेशीर आहे, गरोदरपणात प्रसूती वेदना खूप गंभीर असतात. पण तज्ज्ञांच्या मते खजुराच्या सेवनाने प्रसूती वेदना कमी होण्यास मदत होते. हेल्थलाइनच्या अहवालात म्हटले आहे की, खजुराच्या सेवनाने रक्त परिसंचरण वाढण्यास मदत होते. त्यामुळे गर्भाशय ग्रीवामध्ये लवचिकता आणि वाढ होते आणि प्रसूती वेदनांमध्ये कमी वेदना सहन कराव्या लागतात. संशोधनानंतर ही माहिती समोर आली, ज्या महिलांनी गरोदरपणात दररोज ६ खजूर खाल्ले त्यांच्या प्रसूती वेदना कमी झाल्याचे दिसून आलं आहे.हेल्थलाईनच्या मते, खजुराचे सेवन केल्याने खालील फायदे मिळू शकतात.खजूर खाल्ल्याने संसर्गविरोधी क्षमता विकसित होते. कारण, त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील पेशींना रोगांपासून संरक्षण देतात. खजूराचे सेवन मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते. कारण, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे मेंदूच्या पेशींची इंफ्लामेशन कमी करून त्यांची क्षमता विकसित करतात.खजूरांमध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक हाडे मजबूत होण्यास मदत करतात.
टीप – गर्भधारणेदरम्यान खजूर किंवा इतर कोणताही आहारात बदल करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका