पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली केली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले अरविंद गोकुळे यांची बदली केली आहे. तर हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र धैर्यशील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहे.
पुणे शहर पोलिस दलातील पोलिस आस्थपना मंडळाची बैठक आज १ जुलै रोजी पार पडली. त्यामध्ये रविंद्र शेळके यांना हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यास मान्य्ता देण्यात आली आहे.
दरम्यान , हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या सर्व पोलिस निरीक्षकांपेक्षा रविंद्र शेळके हे सिनिअर असल्याने त्यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.