पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र दाखवून लुटमारीचे प्रकारात वाढ झाली असून, सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशाल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक,नितीन कांबळे पोलीस अंमलदार, पोलिस हवालदार शंकर नेवशे, विनोद चव्हाण, पोलीस नाईक, गणेश थोरात. पोलीस नाईक प्रमोद कोकणे, पोलिस शिपाई गजानन सोनोने, समीर पटेल, कादिर शेख, नागनाथ राख व महिला पोलिस हवालदार साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे. युनिट -2 हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना, सेंट्रल स्ट्रीट चौकीजवळ आले असता.
कादिर शेख व समीर पटेल यांना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की, समर्थ पोलीस स्टेशन कडून तडीपार केलेला रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण हा खड्डा गॅरेज मंगळवार पेठ पुणे. येथे जवळ पिस्टल बाळगून थांबलेला आहे. त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण राहणार 207 सोमवार पेठ पुणे 11 दारूवाला पूल श्रेयश अपार्टमेंट सध्या रा वेणू आपार्टमेंट तिसरा मजला निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड पुणे असे सांगितले.
सदर आरोपी पुणे पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगार असून त्याचे वर जबरी चोरी शरीराविरुद्ध गुन्हे करणारा असून त्याचे वर पुणे शहरात आर्म अॅक्ट व जबरी चोरीचे 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तसेच एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी असून समर्थ पोलीस स्टेशन कडून पुणे जिल्ह्यातून तडीपार आहे. त्याच्या विरोधात येरवडा, समर्थ, सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.