पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी
कोंढवा मध्ये अनधिकृत बांधकामे फोफावली असून त्यात अवैध गौण खनिज उत्खननाचे देखील प्रकार वाढले आहेत. गौण खनिज करताना रितसर तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकारकच असताना लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याचे समोर आले आहे.
कोंढवा शितल पेट्रोल पंपासमोर कमलदीप सोसायटी आहे सोसायटीच्या आत ढोणे सुझुकी म्हणून शोरूम सर्विस स्टेशन असून त्या शोरूम च्या हाकेच्या अंतरावर उजव्या बाजूस अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असल्याची तक्रारी समोर येत आहे.
तहसील कार्यालयाकडे अधिक माहिती घेतली असता अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, तलाठी यांना सदरील ठिकाणी पाठवून पंचनामे करण्यास सांगून पुढील कारवाई करून दंडासहीत वसुली करण्यात येईल.