कोंढव्यात पुणे महानगर पालिके च्या मालमत्तेवर अनधिकृतपणे कब्जा; लाखो रुपये बेकायदेशीर लाटल्याचा आरोप

0
Spread the love

माजी नगरसेवकांची सदरील जागा ताब्यात घेण्याची मागणी.

कोंढवा पोलीस ठाण्यात पालिकेने तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ का? तर पुणे महानगर पालिका डोळे मिटून गप्प का?

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎)

कोंढव्यातील सर्वे नंबर ४६ मिठागर येथे पुणे महानगर पालिकेची ॲमॅनिटी स्पेसची जागा असल्याने स्थानिक नागरिकांना त्या जागेचा वापर व्हावा म्हणून माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नाने सदरील जागेवर हजरत अबु हनिफा हे मोठे हॉल बांधण्यात आले, परंतु त्या हॉलचा वापर काही मोजक्या लोकांसाठी होत असल्याचा आरोप होत असल्याने पुणे महानगर पालिकेच्या समाज विकास विभागाने सदरील हॉल सीलबंद केले होते. परंतु काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी सीलबंद केलेले हॉल उघडून अनधिकृतपणे त्याचा वापर सुरू केला आहे. सदरील हॉल नागरिकांना मोफत मिळवा त्या संदर्भात समाजिक कार्यकर्ते आसलम बागवान यांनी आंदोलन ही केले होते.

परंतु पुणे महानगर पालिकेची कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी न घेता स्थानिक नागरिकांची लूट होत असल्याचा प्रकार हाजी फिरोज शेख व माजी नगरसेवक रईस सुंडके यांनी उघडकीस आणला आहे. फिरोज शेख व रईस सुंडके यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर ते हजरत अबु हनिफा हॉल येथे गेल्याने नागरिकांची बर्याच प्रमाणात लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सादीक मजाहरी हे सदरील हॉल चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने शेख व सुंडके यांनी पुणे महानगर पालिकेने दिलेल्या परवानगी बाबतीत मजाहरी यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने रईस सुंडके यांनी मजाहरी यांच्याकडे लग्न समारंभासाठी बुकिंग केलेली डायरी हिसकावून घेतली असता, त्यात अंदाजे १५ लाख रुपयांची बुकिंग झाल्याचे आढळून आल्याचे हाजी फिरोज शेख यांनी पुणे सिटी टाईम्सला माहिती दिली आहे.

जागा महानगर पालिकेची असताना लाखो रुपयांची रक्कम कोणाच्या घशात जात आहे. या बाबतीत पुणे महानगर पालिकेतील समाज विकास विभागातील अधिका-यांना माहिती असतानाही कारवाई करण्याचा विसर त्या अधिका-यांना पडला आहे. अधिक माहिती घेतली असता ब्राईट फिव्हचर या सामाजिक संस्थेला चालविण्यास देण्यात येणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.परंतु संस्था, संघटना, ट्रस्ट यांना चालविण्यासाठी न देता पुणे महानगर पालिकेने स्वतः चालवावे अशी मागणी कोंढव्यातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पुणे महानगर पालिकेने तातडीने सदरील हॉल ताब्यात घ्यावे व अनधिकृतपणे नागरिकांकडून लाखो रूपये उकळणाऱ्या विरोधात पालिकेने तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.
समाजिक कार्यकर्ते; हाजी फिरोज शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here