पुणे महानगर पालिकेकडून हज यात्रेकरूंसाठी लसीकरण मोहीम; लसीकरण करण्याचे आयुक्त विक्रमकुमार यांचे आव्हान

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

राज्य शासनाच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हज यात्रेकरूंसाठी मेंदूज्वर, पोलिओ व इन्फ़्लुएन्झा एच१ एन१ लसीकरण मोहीम २०२३ राबविण्यात येत आहे.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत साधारणपणे १२०० हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सदर लसीकरण रविवार २८ मे २०२३ रोजी,सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजता कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे येथे आयोजित केले आहे. तरी, हज यात्रेकरीता जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना मेंदूज्वर, पोलिओ व वय वर्षे ६५ वरील यात्रेकरूंसाठी मेंदूज्वर,पोलिओ व इन्फ़्लुएन्झा एच१ एन१ चे लसीकरण करण्यात येणार आहे.

तरी हज यात्रेसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.असे आवाहन विक्रमकुमार महापालिका आयुक्त यांचेकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here