पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील वाहतूक पोलिस हवालदार भररस्त्यात नागरिकांकडून वसुली करत असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता. त्या मुळे पोलिसांबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्या संदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी चौकशी चे आदेश पारित केले होते. त्या अनुषंगाने,प्रभारी अधिकारी, लष्कर वाहतूक विभाग, पुणे शहर यांचेकडील जा.क्र. /१४३/२०२४, १ एप्रिल २०२४ रोजी अहवाल सादर केला. त्यात पोलिस हवालदार /७४१ विजय सेवालाल कनोजिया यांची नेमणूक लष्कर वाहतूक विभाग अंतर्गत ३० मार्च २०२४ रोजी महावीर चौक यथे कर्तव्य दिले असताना अंदाजे दुपारी १:२० वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी कोहीनूर हॉटेल कॅम्पच्या बाजुने महावीर चौकाकडे आली असता सदर दुचाकीवर एक पुरुष/एक महीला असे होते. त्यांचे दुचाकीचे नंबर फॅन्सी असल्याने त्यांना आपण बाजुला घेवुन त्यांचे दुचाकीवर दंडात्मक कारवाई न करता तुम्ही दुचाकीस्वार यांना सोडुन दिले. त्याचा व्हीडीओ कुणीतरी बनवुन ‘मार्च एन्ड एम जी रोड’ असा मेसेज़ तयार करुन सदरचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.
आपण सदर दुचाकीस्वार यांचे वाहनावर कायदेशीर कारवाई न करता सोडुन दिले, सदर संशयास्पद वर्तनाच्या व्हायरल सोशल मिडीयाच्या क्लीपमुळे पोलीस दलाची प्रतीमा मलीन झाली आहे.
त्या अर्थी तुम्ही तुमचे कर्तव्य करीत असताना बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलीस खात्यास अशोभनिय असे गैरवर्तन करुन अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी केल्याने कनोजिया यांना मुंबई पोलीस (शिक्षा व अपिल) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (१) (ब) च्या तरतुदीनुसार व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५ व २६ अन्वये पोलिस उपायुक्त यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन,
विजय मेवालाल कनोजिया, नेमणुक, लष्कर वाहतूक विभाग यांना शासकिय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी काढले आहे.