सावधान : वडापाव व खाद्यपदार्था साठी न्युजपेपरचा वापर करत असाल तर अन्न व औषध प्रशासन विभाग करणार कारवाई,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, आपण आज वडापाव, भजी व इतर खाद्यपदार्थ घेताना हातगाडीवाले किंवा हॉटेल मध्ये सर्रास पणे न्यूपेपरचा वापर केला जातो. त्याला विरोध न करता आपण निमुटपणे ते घेऊन निघून जातो. परंतु त्या खाद्यपदार्थ मधून निघणारे तेल व न्यूज पेपर मधील शाई ही नागरिकांसाठी घात असल्याचे अनेक जाणकारांनी याला विरोध केला होता.

उशीरा काई होईना अखेर कारवाईचे पत्र अन्न व औषध प्रशासन विभागाने काढले आहे.अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात २०११ पासुन लागु करण्यात आला आहे.

कायदयाचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न् उपल्ब्ध करुन देणे हा आहे.अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न् व्यवसायिक हे वडापाव, पोहे या सारखे अन्न् पदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.

तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात.अशा न्युजपेपरमध्ये गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे.

त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी २०१६ साली आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तरी सर्व अन्न् व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात आले आहे.

न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्याची ताकिद शिवाजी देसाई सह. आयुक्त यांनी प्रसिद्धपत्रात दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here