हडपसर येथील पेट्रोल पंपात पेट्रोल भरत असताना २१ वाहनांमध्ये पाणी भरल्याचा प्रकार आला समोर,

0
Spread the love

परिसरात नागरिकांची उसळली गर्दी.

अन्न धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले हे तपासण्यासाठी दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, हडपसर वैद्यवाडी येथील पेट्रोल पंपात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनात थेट पाणीयुक्त, भेसळयुक्त पेट्रोल भरल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामुळे हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. यापुर्वीही सदरील पेट्रोल पंप सिल करण्यात आले होते. परंतु काही काळानंतर पुन्हा ते पेट्रोल पंप सुरू झाले होते.

परंतु आता पुन्हा भेसळयुक्त पेट्रोल भरत असल्याचा प्रकार समोर आल्याने सदरील पेट्रोल पंपाबाबतीत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

अधिक माहिती घेतली असता सदरील पेट्रोल पंपावर पोलीस दाखल झाले असून पोलीसांकडून पाहणी केली जात आहे तर सदरील तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर कंपनीचे अधिकारी व अन्न धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, ड परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ, पुरवठा निरीक्षक कृष्णा जाधवर हे देखील तपासणीसाठी दाखल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here