२०१७-१८ साली पासून कारवाईच नाही, फक्त नोटीसांचा प्रसाद?
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, कोंढवा येथील अनधिकृतपणे टेरेसवर चालणा-या हॉटेलांना अभय मिळत असल्याने कारवाईच होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोंढवा येथे अनेक ठिकाणी “टेरेस” वर अनधिकृतपणे बिनधास्त हॉटेल व्यावसायिकांनी थांड मांडला आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता इमारतींच्या टेरेसवर अनाधिकृतरित्या ‘रूफ टॉप’ चा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई बडगा उभारण्यास कुचराई केली जात आहे.
मुंबई येथील टेरेसवरील हॉटेल मध्ये लागलेल्या आगीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर टेरेस वरिल रूफ टॉप टार्गेट झाले होते. परंतु कारवाई ही फक्त नावालाच असती हे दाखवून दिले जाते.दिलेल्या माहितीनुसार शहरातील व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर व्यावसायिक कारणांसाठी ‘रूफ टॉप चा वापर करण्यास कोणासही, पुणे महापालिके च्या बांधकाम विभागाकडून अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही.
लॉकडाऊनच्या काळात व नंतरच्या काही महिन्यात इमारतींच्या टेरेसवरील अनाधिकृत बांधकामे वाढली आहेत.व्यावसायिक इमारतीचा बांधकाम परवाना देताना इमारतीच्या टेरेसचा वापर सर्वांनाच करता येतो पण टेरेसवर हॉटेल, रेस्टॉरंट अॅण्ड बार अशा व्यावसायिक वापरास परवानगी दिलेली नाही.
तर महानगरपालिकेने १) द व्हिलेज-व्हेजेटा – मार्वल दिल्हा गेरा जंक्शन :
लुल्लानगर, कोंढवा, पुणे,२) द एक्सोटिक रूफ टॉप रेस्टारंन्ट स.नं.१, पिकासो प्लाझा, ज्योती हॉटेलवर, कृष्णकेवल नगर, शिवनेरी नगर, कोंढवा रोड, पुणे,३) द टेरेस – सी-१, ब्रम्हा मॅजेस्टीक, कोंढवा रोड, पुणे,४) क्लब 24, ५) द बिटटोस, आणि एन आय बी एम रोड वरील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचे रेस्टॉरंट प्रकरण कोर्टात चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हेजेटा रेस्टॉरंटवर २०१७ साली कारवाई करण्यात आली होती तर द एक्सोटिक रेस्टॉरंटला १ जानेवारी २०१८ साली आणि द-टेरेस रेस्टॉरंट या दोघांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ कलम ५३(१) नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. पुणे मनपाने फक्त नोटीसा बजावण्याचे काम केले असून पुढील कारवाई करण्यास का चालढकल करत आहे.
रूफ टॉप वरील रेस्टॉरंट मध्ये आगीची घटना घडली तर याला जबाबदार कोण? पालिका का बरं कारवाई करत नाही? याला पालिकेच्या अधिकाऱ्यांची पाठराखण आहे का? आणि कोणत्या माननीयांची ? छोट्या छोट्या कारवाईत धन्यता मानणारे अधिकारी टेरेसवर अनधिकृतपणे चालणा-या हॉटेलांवर कडक अधिकारी धडक कारवाई करणार? याकडे लक्ष टिकून राहणार आहे.