स्वतःच ठेवायच झाकून दुसऱ्याचं दंड पाहयंच वाकून?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून तोंड बघून व आपले माणस, यंत्रना बघून कारवाई केल्या जात असल्याने पुणेकरांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. पुणेकरांवर केलेल्या कारवाईचे मोठमोठे रकमेचे आकडे जाहीर केले जातात, मात्र आपले झाकून दुसऱ्याचं उघडयावर आणतात? म्हणजेच आपल ठेवायचं झाकून दुसऱ्याचं दंड पाहयंच वाकून? अशी अवस्था पोलिसांची झाली आहे का?
झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल कटींग, हेल्मेट, सिट बेल्ट, फोनवर बोलताना वाहन चालविणे, अश्या प्रकारे पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते व कोट्यवधी रुपये दंड वसूल केला गेल्याचे जाहिर केले जाते. मात्र कारवाई करताना शासकीय वाहनांनी केलेल्या नियमभंगाची माहितीच पुणे शहर वाहतूक पोलिसांकडे नसल्याने धक्कादायक माहिती “पुणे सिटी टाईम्सच्या” हाती आली आहे.पुणे शहर वाहतूक शाखेला शासकीय वाहनांवर केलेल्या कारवाईची माहिती, माहिती अधिकारात मागितली होती.
१ :- पीएमपीएमएल बस व पुणे शहर पोलीसांच्या वाहनांनी झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल कटींग,सिट बेल्ट, वाहन चालवताना फोनवर बोलुन नियमभंग केल्याप्रकरणी आपल्या वाहतुक शाखेकडुन करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची संख्या व त्याची प्रति मिळावी. (सन २०१८ ते आजतागायत )
उत्तर :- झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल कटींग, सिट बेल्ट, वाहन चालवताना फोनवर बोलुन नियमभंग केल्याप्रकरणी वाहनांवर कारवाई करताना पोलीस किंवा पीएमपीएमएल बस असे स्वतंत्र चलन दिसुन येत नाही. त्यामुळे सदरची माहिती वाहतुक शाखा, पुणे शहर या कार्यालयाचे अभिलेखावर उपलब्ध नाही.
२ :- तसेच पुणे पोलीसांनी खाजगी दुचाकी व चारचाकी वाहनांवर पोलीस लिहिल्याबद्दल व वाहतुक पोलीसांचे लोगो लावल्याबद्दल केलेल्या कारवाईची संख्या व त्याची प्रत मिळावी. (सन २०१८ ते आजतागायत) उत्तर :- दंडात्मक कारवाई ही पोलीस, डॉक्टर, वकील, तसेच इतर प्रकारच्या लोगो असणा-या वाहनांवर सरसकट केली जाते. खाजगी वाहनावर सरसकट केली जाते. खाजगी वाहनावर पोलीस अथवा वाहतुक लोगो लावण्याबाबतच्या माहितीची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात येत नाही. त्यामुळे सदरची माहिती वाहतुक शाखा, पुणे शहर या कार्यालयाचे अभिलेखावर उपलब्ध नाही.असे उत्तर सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर एम.एस.सय्यद यांनी दिले आहेत.
परंतु मागील पोलिस आयुक्तांच्या कारकिर्दीतील कारवाई पाहिलीत तर पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग व रशमी शुक्ला यांनी नियमभंग करणा-या शासकीय वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.तर खाजगी वाहनांवर पोलिस व वाहतुक शाखेचे लोगो वापरणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु आता “नवा भिडू नवा राज ” आल्याने फक्त नागरिकांवर केलेल्या कारवाईचा आकडा दाखवला जात आहे.
आज पुणेकर उघड डोळ्याने रस्त्यावर पाहत आहे की पोलिस बिट मार्शल दुचाकीवरून जाताना विना हेल्मेट वाहने दाटताना दिसतात, पोलिसांची चारचाकी वाहन चालविणारे ड्रायव्हर महाशय, व पीएमपीएमएल बसचे नियम तोडणारे चालक विना सिट बेल्ट व फोनवर बोलताना आणि झेब्रा क्रॉसिंग करून वाहने चालविताना दिसतात, परंतु वाहतूक पोलिसांना दिसत नाहीत का? आणि विषेश म्हणजे खाजगी वाहनांवर पोलिस व वाहतूक पोलिसांचे लोगो वापरणाऱ्यांवर कारवाई करणे बाबतीत अनेक आदेश आहेत. परंतु त्या आदेशाला आज केराची टोपली दाखवून पळवाट काढली जात आहे. असं तर नाही ना आपले आपलेच असतात दुसऱ्यांवर मात्र कारवाई करून मोकळे? अशी मानसिकता झालीयं का? अशी खंत पुणेकरांनी व्यक्त केली आहे.
तत्कालीन पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड, प्रविण मुंडे, कल्पना बारावकर, अशोक मोराळे, ते २०१७ पर्यंत पोलिसांवर व शासकीय वाहनांवर केली जाणारी कारवाईची आकडेवारी झाहिर करणारी वाहतूक शाखा आता ती आकडेवारी का दळवत आहे? असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहे.
तर नियम सर्वांना समान असून नियम भंग करणाऱ्या शासकीय वाहनांवर व पोलिसांवर कारवाईची मागणी पुणेकरांनी केली आहे. शासकीय वाहने व कर्मचारी नियमभंग करत असतील तर पुणे सिटी टाईम्सच्या whatsaap ९८८१४३३८८३ या नंबरवर फोटो पाठविण्यात यावे.
” तिसऱ्या डोळ्याची कारवाई फक्त सर्वसामान्य पुणेकरांवरच का? “
पुणेकरांनी नियमभंग केले तर रस्त्या रस्त्यात लावलेले पुणे पोलिसांचे कॅमे-या मार्फत ( तीसरा डोळा) दंडात्मक कारवाई केली जाते. व ते वसूली देखील तेवढीच तत्परतेने केली जाते, परंतु रस्त्यावर फिरणाऱ्या शासकीय वाहनांवर दंड करण्याचे धाडस पुणे शहर वाहतूक पोलिस करताना दिसत नाही. यातून असे दिसते की वाहतूक शाखा निष्पक्षपातीपणे कारवाई करत नसून फक्त कारवाईसाठी व नियमांची अमंलबजावणी करण्यासाठी फक्त पुणेकरच दिसत आहेत.