सर्वे नंबर ४६ कम्युनिटी सोसायटी शेजारी ४ अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरू असताना पुणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष का? ( Kondwa News)
पैसे दिल्यावर कारवाई होत नसल्याचे चिचाचे विडिओतील वक्तव्य?
पुणे सिटी टाईम्स, प्रतिनिधी : पुणे शहरातील उपनगर भागात कोंढव्यात
अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असून फक्त आलेल्या तक्रारीवर व पाठपुरावा करत असलेल्याच तक्रारीवर कारवाई होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तर काही ठिकाणी फक्त नावालाच बांधकाम विभाग झोन २ ने नोटिसा दिल्याचे दिसून येते आहे. कोंढव्यातील अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू असून कोणाच्या आशिर्वादाने सगळी अनधिकृत बांधकामे सुरू आहे.
या बद्दल सांगायची गरज नसुन सर्व स्थानिकांनी कोणाचे कोणासोबत हितसंबंध आहे हे दिसून येत आहे. कोंढव्यातील सर्वे नंबर ४६ हिस्सा नंबर ६२ कम्युनिटी सोसायटी ( उमा सोसायटी समोर) ४ इमारतींचे नऊ-नऊ अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. सदरील ठिकाणी चालू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना १० महिन्यांपूर्वी पुणे महानगर पालिकेतील बांधकाम विभाग झोन २ ने नोटिस बजावली होती.
त्यावेळी सदरील बांधकामाचे ३ मजल्यापर्यंत काम झाले होते. नोटिस बजावली नंतर काही दिवस काम थांबले परंतु पुन्हा काम चालू करत आज ते बांधकाम ९-९ मजल्यापर्यंत गेले असताना मनपा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी अनधिकृत बांधकाम संदर्भात तक्रार केली असता उपअभियंता प्रविण शिंदे व ज्युनिअर इंजिनिअर विजय कुमावत यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे.
या संदर्भात खान यांनी कार्यकारी अभियंता राहुल सांळुखे यांच्याकडे सदरील तक्रार केली असता सांळुखे यांनी सदरील अनधिकृत बांधकामाला ५३(१) ची नोटीस बजाविण्यात फर्मावले होते. परंतु सांळुखे यांच्याच फर्मानाला ज्युनिअर इंजिनिअर विजय कुमावत यांनी केराची टोपली दाखवली आहे.
प्रविण शिंदे हे कुमावता़ंकडे तर कुमावत शिंदेकडे बोट दाखवून मोकळे होत आहे. अनधिकृत बांधकामांना या दोघांचा तर अभय नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे कार्यालयात तक्रार दाखल झाल्यानंतर व वरिष्ठांच्या निर्दशनास सदरील प्रकार आणून दिल्यानंतर सदरील बांधकामाला रंगरंगोटीचे काम गतीने केले जात असल्याचे दिसून आले आहे.
तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही याची माहिती सदरील बांधकाम व्यावसायिकाच्या हस्तकला ( चिचा) विचारले असता जो कार्पोरेशन ( corruption) के साहब को पैसे देते है उनपर कारवाई नही करते है, असे विडियो पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींच्या हाती लागले आहे. मग खरंच असे प्रकार चालू असेल का? का बांधकाम व्यावसायिकांचे हितसंबंधामुळे तर कारवाईसाठी टोलवाटोलवी केली जात नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे?
या संदर्भात वाजिद खान म्हणाले दोन-तीन दिवसांत कारवाई झाली नाही तर सदरील बांधकाम कामांविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात मंत्रालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.