मारहाण, शिवीगाळ व्हायरल व्हिडिओ video प्रकरण
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणीक यांनी नागरिकांना एका बंद खोलीत मारहाण करत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ते व्हिडिओ पाहून पुणेकरांनी संताप व्यक्त केला होता.

तर पुण्यातील काही सामाजिक संघटनांनी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली होती. तर सदरील मारहाणीचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाल्याने व एका महिलेने महाराष्ट्र राज्य महिला हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता प्रकरण चांगलेच पेटण्याची शक्यता आहे.
महिला आयोगाने त्या महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन पुणे पोलिस आयुक्तांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. महिला आयोगाने घेतल्याने पुराणिक यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
त्यांच्यावर वरिष्ठ पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तर पुराणीक यांच्या विरोधात आणखीन तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे.