पुण्यातील सिंहगड रोडवरील गार्डीयन हॉमस प्रायव्हेट लिमिटेड कंन्ट्रक्शनच्या बांधकाम साइटवरून पडून कामगाराचा मृत्यू

0
Spread the love

दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

इमारतींचे बांधकाम करताना अनेक बांधकाम साईटवर कामगारांच्या जीवाची परवा न करता आणि त्यांना आवश्यक साधने न पुरविता उंच उंच इमारतींवर कामे करण्यास ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक भाग पाडत असल्याने जीव धोक्यात घालून कामे करावी लागतात, आणि त्यातूनच वरून पडून कामगारांचा मृत्यू होत असल्याची घटना रोज कुठे ना कुठे घडत आहे.

अशीच एक घटना सिंहगड रोडवर घडली आहे.जयदेवनगर शेजारी सिंहगड रोड,येथे गार्डीयन हॉमस प्रायव्हेट लिमिटेड या कंन्ट्रक्शन कंपनीचे बांधकाम साईटवर ठेकेदारा मार्फत काम चालू आहे.

गार्डीयन हॉमस प्रायव्हेट लिमिटेड या कंन्ट्रक्शन कंपनीचे बांधकाम चालु असलेल्या साईटवरील, कामगाराचे जिवीताचे व सुरक्षीततेच्या दुष्टीकोनातुन कामगारांकडुन काम करवुन घेत असताना, त्यांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट इत्यादी योग्य ती साधनसामुग्री पुरविणे आवश्यक आहे.

परंतु तशी कोणतीही सुरक्षित साधने न पुरविता,तसेच उघडया डक्टवर योग्य ती साधन ठेवण्याची सोय न करता, हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे एका बिगारी महिला मीनाकुमारी अशोककुमार साहु, वय ४१ वर्षे,रा.सिंहगड रोड,हया इमारतीचे सोळाव्या मजल्यावर टाईल बसविणेचे काम करीत असताना, तीचा तोल जावुन, ती वरून खाली पडुन,डोक्यास गंभीर दुखापत होवुन मयत झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. टी. जगदाळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here