ब्रेकिंग न्यूज: कोंढव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवारांनी अजितदादांचा फोटो हटवून सुप्रिया सुळेंचा फोटो लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,

कोंढव्याच्या राजकारणात कोणाचा पत्ता कधी कट होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून ‘अजित दादा, अजित दादा’ म्हणणारे आता त्यांच्या कुशीतून खाली उतरल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. कोंढवा कौसरबाग प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवार हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्या विरोधात येणाऱ्या बातम्या आणि जनतेचा विरोधी कौल पाहता, “गंगाधर हा शक्तिमान आहे! आणि शक्तिमान हा गंगाधर आहे!” अशी वक्तव्ये रंगत आणली आहेत. अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत असले तरी हे पॅनल आता शरद पवार गटाच्या “तुतारी” या चिन्हावर निवडणूक लढवत आहे.

पुर्वी चे पॅम्पलेट.   “चाचा ही भतीजा है” और “भातीजा ही चाचा आहे” अशी चर्चा कोंढव्यामध्ये रंगल्याने, त्या उमेदवारांनी जनतेच्या विरोधाची दखल घेऊन थेट अजित पवारांचा फोटोच हटवल्याचे दिसून आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे..                                                                                                                                                                                                                                               “तुतारी चिन्हाबाबत जनतेचा कौल काय?”

अजित पवारांनी भाजपसोबत युती केल्याने आणि मुस्लिम समाजाबाबत भाजपकडून वारंवार होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कोंढव्यातील मतदार अजित पवार गटाच्या उमेदवारांपासून दूर राहण्याची शक्यता आहे. आता अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र आल्याने अप्रत्यक्षपणे भाजपलाच मजबुती मिळणार, कारण ते सध्या राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिले जाणारे मत कोणाच्या पदरात पडणार हे नागरिकांना स्पष्ट झाले आहे.

आत्ताचा पॅम्प्लेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here