पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
कॉग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात वारंवार तक्रार वाढल्या असून अजून आणखीन एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या नावे व इतर भागीदारांच्या नावे सिटी सर्व्हे नंबर ९६६/१ मालमत्तेवरील बांधकाम उत्कर्ष असोसिएटसने बांधकाम चालू आहे.

धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा उल्लेख केला नसल्याचे समोर आल्याने समाजिक कार्यकर्ते अनवर शेख यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
अनवर शेख यांनी यापूर्वीही धंगेकर यांच्याविरोधात बाबरी मस्जिद वर रामांचा फोटो लावून बॅनर लावल्या बद्दल तक्रार केली होती. अनवर शेख म्हणाले पुणे लोकसभा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी वक्फ बोर्डाच्या २०० कोटींच्या मालमत्तेवर पत्नीचा हक्क सांगून ही मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि त्यावर काम सुरू केले.

आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता ही खरेदी किंवा विकता येत नाही असा नियम असतानाही सदरील फ्लॅट विकण्यास सुरू केले आहे.निवडणूक आयोगाला चुकीचे प्रतिज्ञापत्र दिल्याने सध्या काम रखडले आहे. त्यामुळे यावर आम्ही आक्षेप घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.अशी माहिती अनवर शेख यांनी दिली आहे.



