कोंढव्यात काँग्रेसचे तिन्ही उमेदवार ठरले जायंट किलर; जनतेचा कौल अन् त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का?

0
Spread the love

तस्लीम हसन शेख, काशिफ सय्यद, आसिया मणियार कोंढव्याचे धुरंधर..

हाजी गफूर पठाण यांचा आखीर काम बोलता है..

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,

कोंढवा कौसरबाग प्रभाग क्रमांक 19 मध्ये जोरदार लढत पाह्यला मिळाली. तर जनतेचा कौल महत्त्वाचा ठरला, जनता जनार्दनाला काहीतरी बदल हवा असल्याने तो बदल कोंढव्याच्या जनतेने करून दाखवला आहे. आता जनता जनार्दनाच्या अपेक्षाला या ४ ही नगरसेवक खरं उतणार का? असा प्रश्न कोंढवाकर आतापासूनच उपस्थित करत आहे.कोंढव्यात अतिक्रमण,बेकायदेशीर बांधकामे,रस्ते, पाणी, व पाणीचे अवजड टॅंकर,कचरा, हे नागरिकांसमोर समस्यांचा डोंगर आहे.तर कोंढव्यातील महिलांसाठी प्रस्तुतीग्रह, महिलांसाठी शासकीय योजना, लहान मुलांसाठी वृद्धांसाठी चांगले उद्यान, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चांगले ट्राफिक पोलीस व ट्राफिक वॉर्डन, चांगले फुटपाथ,सिग्नल व कॅमेरे, मॉं खतीजा दवाखाना पुर्ण क्षमतेने चालू करणे, महिलांसाठी घर बसून कामे, व इतर व्यवस्था केली तरच ४ ही नगरसेवक जनतेच्या मनावर राज करणार आहेत.

” नव चर्चित नगरसेवकांची माजी नगरसेवकांना टक्कर “

काशिफ फकरूल सय्यद हे आयटी फॅक्टर मध्ये काम करणारा एक व्यक्ती त्यांनी कोंढव्याचा विकासासाठी एक पाऊल उचलला आणि तो पाऊल विजयाची वाटचाल ठरला, त्यांना विश्वासच नसेल मी जिंकून येणार म्हणून, काशिफ सय्यद यांनी प्रभाग क्रमांक १९ क” मधून निवडणूक लढवली. निवडणूक लढत असताना त्यांच्या समोर दोनदा नगरसेवक असलेले मनसेचे दिग्गज साईनाथ बाबर तर दोनदा नगरसेवक असलेले रईस सुंडके व सतपाल पारगे असे मिळून १२ जण १९ क” मधून निवडणूक लढवत होते.

सदरील निवडणूकीत जिंकून येणे काशिफ सय्यद यांना जिंकून येणे सोपे नव्हते, कारण एकीकडे मनसे साईनाथ बाबर यांचं वर्चस्व आणि रईस सुंडके यांच्याकडे मुस्लिम मते यामुळे निवडणूक आणखीन चुरशीची होणार होती. तर काशिफ सय्यद यांनी भोंग्याचा मुद्दा ऐरणीवर आणून साईनाथ बाबर यांना चित केले तर रईस सुंडके यांना हरवण्यासाठी मोठी रणनीती आखली होती. अखेर काशिफ सय्यद यांनी निवडणूकीत बाजी मारून १७४७८ मतांनी विजयी खेचून आणला तर साईनाथ बाबर १२६३७ व रईस सुंडके ११८११ मते घेऊन पराभूत झाले.

तस्लीम हसन शेख हया एक गृहिणी त्या एकदम साध्या, तर त्यांचे पतीचे नावे म्हणजे चर्चेतलेच, हसन शेख यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कामकाज मोहसीन शेख यांच्याकडे आले बघता बघता मोहसीन शेख हे मोठे व्यवसायिक झाले. अन् प्रशांत जगतांपासहीत राजकीय पक्षात आले, अन् मोहसीन शेख यांनी त्यांची आई तस्लीम शेख यांना नगरसेवकाच्या निवडणुकीत मैदानात उतरविले अन् अखेर ते सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे २३४२९ मतांनी विजयी प्राप्त झाले.तर नंदा लोणकर यांना कोंढवाकरांनी नकार दिल्याने त्यांना १४५२३ मत मिळाली तर त्यांचा ८९०६ मतांनी पराभव झाला.

 

आसिया मणियार ह्या निवडणूकीत नवख्या असल्यातरी त्यांचे बंधू मजहर मणियार हे कोंढव्यातील जुने राहणारे, आसिया मणियार यांच्या समोर दिग्गज परवीन हाजी फिरोज व मेघा बाबर, सुप्रिया शिंदे होत्या,आसिया मणियार यांनी १७०६९ मतांनी विजय खेचून आणला तर परवीन शेख यांना १३७०७, मेघा बाबर यांना ६०४०, सुप्रिया शिंदे ५९९१ मते मिळवून पराभव झाला.

” आखीर काम बोलता.. चल पडा “

गफूर पठाण ह्यांनी कोंढव्यात चांगले काम केल्याने कोंढव्याच्या जनतेने गफूर पठाण यांना त्यांच्या कामाची पावती देत पुन्हा एकदा चांगल्याप्रकारे काम करण्याची संधी दिली आहे. गफूर पठाण यांनी आखीर काम बोलता है हे हे वाक्यामुळे जिंकून आले आहे. गफूर पठाण यांनी १७१४४ मतांनी दणदणीत विजय मिळवला, तर काँग्रेसच्या तहेझीब सिद्दीकी यांनी देखील चांगली मते पडली. सिद्दीकी यांना १५०४३, प्रसाद बाबर ८८८५, अमर कैलास गव्हाणे ५८५८ मते मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here