प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर-सॅलेसबरी पार्कमधील घराणेशाहीला विरोध! भाजपाचा हुकुमशाह एक्का अजित पवार गटात प्रवेश करणार?

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

आज राजकारणाकडे पाहिले तर घराणेशाही जोरात आहे. कार्यकर्ते वर्षानुवर्षे जोमाने काम करतात, परंतु मधेच घराणेशाही आणून ऐनवेळी कार्यकर्त्यांना बाजूला करतात. कार्यकर्त्यांच्या कष्टावर पांघरूण घालण्याचे काम हे श्रीमंत आणि प्रभावशाली लोक नेहमीच करत आले आहेत, हे पुणेकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

प्रभाग क्रमांक २१ ‘ड’ मधून भाजपाचा हुकुमशाह एक्का म्हणून ओळखला जाणारा एक कार्यकर्ता गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपसोबत इमानदारीने काम करत होता. मात्र, भाजप घराणेशाहीलाच प्राधान्य देत असल्याचे येथे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

श्रीनाथ भिमाले हे त्यांच्या पत्नीसाठी प्रभाग क्रमांक २१ ‘क’ मधून निवडणूक लढवणार होते. परंतु सत्ता आणि प्रभाग आपल्या हाती ठेवण्यासाठी श्रीनाथ भिमाले आता पत्नीचा पत्ता कट करत स्वतः प्रभाग क्रमांक २१ ‘ड’ (मुकुंदनगर-सॅलेसबरी पार्क) मधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत बंड पुकारले आहे.

वारंवार त्या एकाच व्यक्तीला तिकीट दिले जात असल्याने स्थानिक नागरिकांनीही विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. काही स्थानिक म्हणतात, “आता पुरे झाले, आमच्या प्रभागात आता बदल हवा आहे. राजकारण्यांची घराणेशाही आम्हाला नको.”

दरम्यान, भाजपातील जनसंपर्क चांगला असलेला हा प्रभावशाली कार्यकर्ता आता अजित पवार गटात सामील होणार असल्याचे समजते. यामुळे मुकुंदनगर-सॅलेसबरी पार्क भागात या दोघांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे.

त्या कार्यकर्त्याने भाजप सोडला तर काय होणार?

भाजपाचा तरुण चेहरा आणि विद्वान म्हणून ओळखला जाणारा हा कार्यकर्ता भाजप सोडून गेल्यास मुस्लिम समाज, दलित समाज तसेच इतर समाज त्यांच्यामागे भरघोस मते टाकतील, यात शंका नाही. श्रीनाथ भिमाले आणि त्या कार्यकर्त्यामध्ये आमने-सामने टक्कर झाल्यास दोघांमध्ये जोरदार लढत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here