पुणे : अखेर प्रशांत जगतापांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश..

0
Spread the love

काशिफ सय्यद, मोहसिन शेख यांच्यासह इतरांनी धरला हाताचा पंजा

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुणे : प्रशांत जगताप हे शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा बराच काळ महाराष्ट्रभर गाजली. अखेर त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि कोणत्या पक्षात जाणार याबाबत माध्यमांसह सर्वांनाच उत्सुकता होती. शेवटी प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह हाताचा पंजा धरत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे काशिफ सय्यद आणि मोहसिन शेख यांनीही पंजा हातात घेतला आहे.त्यामुळे आता कोंढवा मतदारसंघात घडी आणि पंजा यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

काशिफ सय्यद आणि मोहसिन शेख यांची कोंढव्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोंढवाकरांना आता बदल हवा असल्याने काशिफ सय्यद व मोहसिन शेख यांची टक्कर घडीला मिळणार आहे. आता पाहायला लागेल की, कोंढवाकर हातात पंजा घेतात की घडी बांधतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here