ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हडपसर सय्यदनगर भागात मोठी खळबळ माजली आहे.
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,
पुण्यातील हडपसर सय्यदनगर भागात एका राजकीय उमेदवाराने ५० लाखांची खंडणी मागितली आणि एका व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने भागात खळबळ उडाली आहे.
हकीकत अशी की, सय्यदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार फारूख यासिन इनामदार यांच्यात सादिक हुसेन कपूर यांच्याशी जमिनीच्या वादावरून संघर्ष निर्माण झाला होता. याप्रकरणी सादिक कपूर यांच्या विरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. त्यानंतर दोघांमधील वाद अधिकच तीव्र झाला.
फारूख इनामदार यांनी सादिक कपूर यांच्या जागेवर बळजबरीने ताबा मिळवला. हा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू होता.सदर जागेवरील ताबा सोडण्यासाठी फारूख इनामदार यांनी सादिक कपूर यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम देऊ न शकल्याने सादिक कपूर हे प्रचंड मानसिक तणावात होते. अखेर ३ जानेवारी २०२६ रोजी सादिक कपूर यांनी आपल्या कॅम्पमधील कार्यालयात आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १) फारूख यासिन इनामदार, २) अफान फारूख इनामदार, ३) जहुर महंमद सय्यद, ४) तन्वीर इब्राहिम मणियार आणि इतर (सर्व राहणार हडपसर सय्यदनगर) यांच्याविरोधात भारतीन न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०८ (२), १०८, ३, ५ अन्वये लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हडपसर सय्यदनगर भागात मोठी खळबळ माजली आहे.



