येवलेवाडीत बेकायदेशीर बांधकामांचा मुक्त संचार!

0
Spread the love

पालिकेचे सर्रास आणि निर्लज्ज दुर्लक्ष! बेकायदेशीर बांधकामांना आवर घालणार तरी कोण?

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

कोंढव्याची वाळवी आता येवलेवाडीत पसरली आहे. महापालिका आणि प्रशासन पूर्णपणे डोळे झाकून बसले असताना येवलेवाडीत बेकायदेशीर बांधकामांचा धडाक्यात सपाटा सुरू झाला आहे. स्थानिक नागरिकांचा संताप आता फुटला आहे.येवलेवाडी पानसरे नगर गल्ली क्र. २ मध्ये सध्या ४ ते ५ बेकायदेशीर बांधकामे जोरात सुरू आहेत. हे बांधकामे दिवसेंदिवस वाढत चालले असून, लवकरच मोठ्या प्रमाणात उभे राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “पालिका आहे तरी कशासाठी? कोंढव्याची अवस्था बिकट झाल्यानंतरही येवलेवाडीत त्याच चुका होत आहेत. ड्रेनेज, पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण यांच्यावर प्रचंड अतिरिक्त भार पडणार आहे.”

नागरिकांचा सवाल:

महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या महसुलावर डल्ला मारण्यात येत आहे का? बेकायदेशीर बांधकामे रोखणार कोण? स्थानिकांनी महापालिका प्रशासनाकडे त्वरित पानसरे नगरमध्ये बुलडोझर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here