पुण्यातील गंगाधाम चौकातील स्टार कन्स्ट्रक्शनकडून रात्री २ वाजता नियम धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खनन; तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?

0
Spread the love

मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुण्यातील मार्केट यार्ड गंगाधाम चौकातील आनंद नगर झोपडपट्टी येथे स्टार कन्स्ट्रक्शनकडून बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बांधकाम करताना गौण खनिज उत्खननासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. गौण खनिज उत्खनन करताना शासनाकडून अटी-शर्ती घातल्या जातात आणि त्या अटी-शर्तींचे पालन होत आहे की नाही, याची खात्री तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांनी करणे बंधनकारक आहे.

परंतु स्टार कन्स्ट्रक्शनकडून परवानगीमध्ये देण्यात आलेल्या अटी-शर्ती धाब्यावर बसवून रात्री २ वाजता गौण खनिज उत्खनन करत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांची बेफिकीर वृत्ती दिसून आली आहे.

 

प्रांताधिकारी विठ्ठल जोशींकडे तक्रार

प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली असली, तरी खालचे अधिकारी व कर्मचारी निष्पक्षपणे कारवाई करतील यात शंकाच आहे.

मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे

मंडल अधिकाऱ्यांना स्टार कन्स्ट्रक्शनकडून रात्रीचे गौण खनिज उत्खनन सुरू असल्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. आणखी प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही पंचनामा केला आहे. संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करू. गौण खनिज उत्खननासाठी त्यांनी परवानगी घेतली आहे.’’ मग परवानगी घेतली आहे, तर सूर्य मावळल्यानंतर गौण खनिज उत्खनन करताच येत नाही. मग स्टार कन्स्ट्रक्शनकडून उत्खनन सुरू आहे, तुम्ही काय कारवाई केली व पंचनामा तयार केला? असा प्रश्न विचारताच त्यांनी फोन कट केला. त्यानंतर पुन्हा फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही. याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरतेय? रात्रीचे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन चालू असेल, तर जेसीबी, डंपर, पोकलेन ताब्यात घेण्याची तरतूद आहे. परंतु मंडल अधिकारी फक्त पंचनामा करण्याचे प्रामाणिक काम करत आहेत. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here