वक्फ बोर्ड व पालिकेशी हातमिळवणी करून जागा बळकावल्याचा आरोप?
वक्फ बोर्डाचा कारभार म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकलने.
पुणे महानगर पालिकेने बांधकाम परवाना देताना सर्च टायटल व इतर कागदपत्रे पाहिलीच नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे शहरात लोकसभेची निवडणूक लागल्याने रणधुमाळी चालू आहे. त्यात आता एम.आय. एम.चे उमेदवार अनिस सुंडके यांनी आरोपांची फैरी झाडून त्यांच्या विरोधातील उमेदवारांची झोप उडवली आहे. अनिस सुंडके यांच्यावर बी” टीम म्हणून आरोप होत असले तरी, त्या आरोपाला पायदळी तुडवून सुंडके यांची गाडी सुसाट वेगाने धावत आहे. आता सुंडके यांनी नवीन वाद उरकून काढला असून रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे?

पुण्यातील मोक्याची जागा बळकावल्याचा आरोप अनिस सुंडके यांनी केला आहे. ९६६/१ रविवार पेठ येथे उत्कर्ष असोसिएटस व इतर भागीदारांनी सदरील जागेत बांधकाम केले आहे. सदरील जागाही १९३५ सालापासून वक्फ बोर्डची असताना रवींद्र धंगेकर यांनी ती जागा बळकावली होती. आणि ती जागा त्यांची पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर यांच्या नावाने करून त्याठिकाणी आता भलीमोठी इमारत उभी केली जात आहे.

सदरील मिळकतही अंदाजे १० गुंठ्याची आहे. त्या जागेची रक्कम आज कोट्यवधींच्या घरात आहे. ती जागा वक्फ बोर्डाची मालकी हक्काची असतानाही पुणे महानगर पालिकेने बांधकाम करण्याची परवानगी दिली कसे काय? अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करूनच परवानगी देतात.मग काय साटेलोटे करून आमदारांना मदत केली का?
तसेच वक्फ बोर्डाची मोक्याची जागा बळकावल्याचे माहिती असताना वक्फ बोर्ड फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे. १ ऑक्टोबर २०२१ रोजी सदरील मिळकत वक्फ बोर्डाने ताब्यात घ्यावी असे पत्रव्यवहार झाला असतानाही, वक्फ बोर्डाना काडीमात्र पत्रव्यवहार देखील केलेला नाही?
वक्फ बोर्डावर आणखीन सुई गडद होत चालली आहे.तर एकाबाजूला धंगेकरांनी आमदार पदाचा गैरवापर तर केला नाही ना? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच धंगेकर यांनी अशी बरीच वक्फ मालमत्ता ताब्यात ठेवली असून त्याचं बिंग लवकरच फोडणार असल्याचे अनिस सुंडके यांनी सांगितले आहे.
अनिस सुंडके म्हणाले अबी तो सिर्फ झाकी है बहोतसे घोटाले बाहर आना बाकी है. याचाच अर्थ अनिस सुंडके यांनी अख्खी कुंडलीच बाहेर काढली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या रवींद्र धंगेकर यांनी अनिस सुंडके यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.



