पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
लोकसभेचे रणकंदन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांची सभा पुण्यात झाल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी यांची सभा पुण्यात होणार आहे. ओवेसी पुण्यात येऊन कोणावर तोफ डागणार हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
AIMIM चे लोकसभा उमेदवार अनिस रशिद सुंडके हे अर्ज भरल्यापासून तर्कवितर्कांना उत आला आहे. सध्या अनिस सुंडके यांची हवा व जोरदार प्रचार पुण्यात पाह्यला मिळत आहे. त्यात विरोधी लोकांना पाहवत नाहीये.
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाना नंतर नक्कीच पुण्यात मते फिरतील यात काहीच शंका नाही. अनिस सुंडके यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ७ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. मात्र, सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही, अशी माहिती अनीस सुंडके यांनी दिली.