पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
ईद-ए-मिलाद म्हणजे मो. पैगंबर साहेबांची जयंती साजरी केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजातील काही लोकांनी, तरूणांनी डीजे लावायला सुरुवात केली. त्या डीजे मुळे लोकांना नाहक त्रास सोसावा लागला. परंतु डीजे काही कमी होत नसल्याने पुणे शहरातील सिरत कमिटीने याच्या विरोधात बंड पुकारला, आणि गेल्या सात आठ वर्षापासून “नो डीजे” ही मोहीम हाती घेतली.
दरवर्षी डीजे वाढतच जात असल्याने यावर्षी ठोस भूमिका काही मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली, व डीजे मुक्त पैगंबर साहेबांची जयंती करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तरुणाई आजही डीजे म्हणजे साऊंड आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
याची दखल घेऊन पुणे सिटी टाईम्सने बहुतांश लोकांची प्रतिक्रिया विचारल्यावर ज्येष्ठ नागरिकांसोबत काही तरुण वर्ग देखील डीजे ( साउंड सिस्टीम) ला विरोध करत असल्याचे दिसून आले आहे.
तर तरुणांकडून माहिती घेतली असता, ते म्हणाले की पैगंबर साहेबांची जयंती बंद पाडण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे. तसेच मिटींग घेताना कोणत्याही कमिटीने आम्हाला विश्वासात घेतलेले नाही.
आम्ही सुध्दा डीजे विरोधात आहोत परंतु आम्हाला साऊंडला परवानगी हवी. असे काही तरूणांनी सांगितले. परंतु यावर आता पोलिस काय भुमिका घेतात उद्या होणाऱ्या मिटींग मध्ये माहित पडेल.